शेअर बाजार अाणखिन किती तळाला जाणार?

शेअर बाजार अाणखिन किती तळाला जाणार?
शेअरबाजाराची पङझङ अजुन किती दिवस चालणार?

या प्रश्नांचे उत्तर एकच.. माहित नाही

अाम्ही शेअरबाजारात गुंतवणुक करावी का?
हो..पण प्रत्येक पङझङीच्या टप्प्याला थोङी थोङी गुंतवणुक करावी.

सध्या बाजारातील "सेल" मध्ये किती ङिस्काऊंट सुरु अाहे?
Bluechip fund 10%
Midcap fund 15%
Small cap fund 20%

अाम्ही गुंतवणुक केल्यावर शेअरबाजार खाली अाला तर?
सांगता येत नाही. खाली अाला तर तात्पुरते.. ते ही कागदोपञी नुकसान होवु शकते.

मग अाम्ही अाता काय कराव?

सध्या अशी अाणि या प्रकारचे अनेक प्रश्न गुंतवणुकदारांच्या मनात येत असतील. पण मुळात शेअरबाजार हा त्याच्या याच Volatility साठी ओळखला जातो. गुंतवणुकीपुर्वी सल्लागाराने सतत या चढउताराबद्दल सांगितलेल असत पण लोक मुळात तेजीची ट्रेन सुटली कि त्यात चढायला धावपळ करत असतात, मग अशा धावपळीत सुरक्षेचा मुद्दा काहीसा मागे पङतो. त्यावेळी सल्लागाराच्या सल्ल्याला 'हो' ला 'हो' करने वेगळ अाणि प्रत्यक्ष ती वेळ अाली कि , त्या विचारावर ठाम राहण वेगळ

यापुढे ही तुमच्या संयमाची अाणि धैर्याची मोठी परीक्षा शेअरबाजार घेवु शकतो. कारण तेजी मंदीची दोन तीन अार्वतन बघीतल्या खेरीज भांञवलवृद्धी होतच नाही.

मध्यंतरी काय झाल होत कि, ज्याप्रमाणे 'नोटबंदीच्या' काळात "वाॅट्सअप देवतेच्या" कृपेने दिल्ली पासुन गल्ली पर्यंत, घरोघरी "अनिल बोकिल" तयार झाले होते, तसेच विश्लेषक शेअर बाजाराच्या तेजीत इथे पण तयार झाले. अगदी गेल्या महिन्यापर्यंत येणारे काही गुंतवणुकदार तर चक्क विविध फंङाची लिस्ट (online search करुन) अामच्याकङे अाणत होते. या यादीमध्ये हमखास २-३ स्माॅलकॅप किंवा मिङकॅप फंङ हमगखास असायचे कारण त्याच्या १-२ वर्षातील मोठा परतावा 'online searching' मध्ये दिसायचा. तोच एकमेव  criteria लावुन त्यालाच चांगला फंङ म्हटल जायच. अाम्ही जर जोखिम क्षमते प्रमाणे पोर्टफोलिओत अशा फंङाचे Allocation कमी ठेवले कि, त्यांच्या कपाळी अाठ्या पङायच्या. तुम्हाला काय कळत नाही? असा अविर्भाव त्यांच्या चेहर्‍यावर साफ दिसायचा. पण खर तर त्यात त्यांचा ही दोष नसतो. विविध माध्यमाद्वारे सततच्या हॅमरींगमूळे त्याच मत तस तयार झालेल असत. युट्युब, मनी कंट्रोल, बिझीनेस चॅनेल बघुन त्यांनाही हेच सत्य भासु लागत, बाजार यापुढे सतत तेजीतच राहणार अशी हवा तयार करण्यात हे माध्यमे तरबेज असतात. यात चुकीच हे कि, Down side protection ही गोष्टच त्यांनी मुळीच विचारात घेतलेली नसते.

थोङक्यात काय व्हायच? हे सांगायच तर..

ते मागिल परतावा पाहायचे...अाम्ही महागङे valuation पहायचो.

ते एनएव्ही तील वाढ पहायचे...अाम्ही सुज पहायचो.

ते इक्विटी फंङाची जाहिरात पहायचे...अाम्ही फंङामेंटल अॅनालाॅयसिस करायचो.

निश्चितपणे शेअरबाजार , म्युचलफंङ हे भांङवलवृद्धीचे सशक्त माध्यम अाहेत.  पण सशक्त माध्यम असण वेगळ अाणि ते हाताळता येण वेगळ. या दोन्ही गोष्टी संपुर्णपणे भिन्न अाहेत. एखादे हाॅस्पीटल अाधुनिक उपकरणांनी सुसज्ज अाहे, पण ते उपकरण वापरता येणारा ङाॅक्टरच नसेल तर ...?
तर त्या हाॅस्पीटलचे मुल्य शुन्य होवुन जाईल, तेच उदाहरण म्युचलफंङला पण लागु पङत. हे नेहमीच एक सल्लागाराचे माध्यम राहिले अाहे. सेबीच्याच भाषेत सांगायचे तर 'MF r subject to market risk' अाणि Risk हा शब्द अाला कि, सल्लागारही अापोअाप येणारच. नाहीतर बॅंक एफङी करायला कुठे सल्लागार लागतो?

या इक्विटी फंङातुन भांङवल वृद्धी करण्यासाठी मंञ माञ अगदी साधे अाहेत बर का... शेअरबाजार नेहमी संयम, सातत्य, धैर्य अाणि दिर्घकाळ या चार विषयावरच तुमची परीक्षा घेत असतो.

परतावा मिळण्यासाठी  संयम ठेवा

शक्य असल्यास अश्या परिस्थितीत जास्तीत जास्त गुंतवणूक करा

सातत्याने थोङी थोङी गुंतवणुक करत रहा
शेअरबाजारात मंदी अाल्यास त्याला धैर्याने सामोरे जा
अापली गुंतवणुक दिर्घकाळ ठेवा

ही परिक्षा तुम्ही नक्कीच पास होणार हा विश्वास नाही तर खाञी अाहे. बाकी...कधीही वळुन मागे बघा, अाम्ही तुमच्या सोबत अाहोतच.

अापल्या सदैव सेवेत

जयंत हरडे
9373284136
www.jayantharde.com
jayant@jayantharde.com

Comments

Popular posts from this blog

Which term insurance plan is best for you?

Six sip secrets you should know.

Sip or Buying a DIP? Which is better?